मणेरे शैक्षणिक संकुलात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 

इचलकरंजी: हबीब शेख दर्जी

दि. ९ एप्रिल सा. महालक्ष्मी टाइम्स व श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट, इचलकरंजी संचलित सौ कुसुमताई बाल मंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयातील ८३ शिक्षक व शिक्षिका यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र  व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मा.डॉ.श्री.सुधाकररावजी मणेरे होते . प्रमुख पाहुणे मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2017 म्हणून ख्याती मिळवणाऱ्या व उद्योजिका म्हणून प्रसिद्ध नावारूपास आलेल्या सौ.शुभांगी शिंत्रे , निवृत वायूसेना अधिकारी पुणे श्री.आर.बी.पाटील सर v व सा.महालक्ष्मी टाइम्सचे सस्थापक संपादक श्री फिरोज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ. काळे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन सौ.चौगुले मॅडम यांनी केले. महिला दिनानिमित्त सौ.नराटे मॅडम यांनी कोरोना काळात शिक्षकांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी श्री आर बी पाटील सर,सौ शुभांगी शिंत्रे मॅडम,श्री फिरोझ शेख यांनी आपली मनोगत व्यक्त केली .
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळे, मार्गदर्शक मा. श्री. संजय देशपांडे सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. मणेर टी.आर, उपमुख्याध्यापिक ऐनापुरे पी.बी, कॉलेज प्राचार्या सौ.माने यु.यु., इनचार्ज श्री.मणेर एम.आर. पत्रकार सलीम मुल्ला,पत्रकार हबीब शेखदर्जी,पत्रकार संजय आंबे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.