डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांची जपानस्थित निसीकेन लि. कंपनीमध्ये निवड

इचलकरंजी: विजय मकोटे

दि ०८ एप्रिलः येथील डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणा-या अनिकेत चव्हाण व निखील कुंभार या दोन विद्यार्थ्यांची जपानस्थित निसीकेन लिमिटेडच्या, जयपूर येथील कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. निवड झालेले दोन्हीही विद्यार्थी निसीकेन, जयपूर येथे विविध पदांवर लवकरच रुजू होणार आहेत. विद्यार्थ्यांचे १०० टक्के क्वालिटी प्लेसमेंट व्हावे यासाठी डिकेटीई मार्फत इंटरव्हयूचे वेळोवेळी आयोजन करण्यात येत आहे.

निसीकेन लि. ही टोकियो, जापनस्थित वस्त्रोद्योगातील नामवंत कंपनी असून टेस्टींग आणि क्वालीटी इव्हॅल्युएशन यामध्ये या कंपनीचा हातखंडा असून या कंपनीने कापड / गारमेंटवर केलेल्या क्वालीटी रीपोर्टसना जगभर मान्यता आहे. १९४८ मध्ये स्थापित झालेली निसीकेन कंपनीचे भारतामध्ये जयपूर या ठिकाणी यांची ब्रँच प्रस्थापित असून हॉगकॉग, चायना, इंडोनिशिया, बांग्लादेश, मॅनमार, व्हीएतनाम इ. ठिकाणी ब्रँचेस आहेत तर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स इ. युरोपिएन देशातील कंपन्यांसाठी ते काम करीत आहेत. यांच्या सर्व लॅब हया जेएनएलए,एनएबीएल,ओईकोटेक्स हयांचे अ‍ॅक्रिडीएशनने मान्यताप्राप्त आहेत.
डिकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्राम्स, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो. उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व सोयीनीयुक्त वर्कशॉप्स, लॅबोरेटरीज, उपलब्ध लायब्ररी सुविधा या सर्वांंमुळे हे विद्यार्थी यशाची शिखरे सर करतात. या सर्वामध्ये डिकेटीईचे ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा.एस.बी. अकीवाटे यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांना डिकेटीईचे डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डे. डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे. पाटील, डिप्लोमा विभागप्रमुख प्रा.आर.एस. वळसंग यांचे मागदर्शन लाभले.