डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती भाजपा कार्यालयात साजरी

इचलकरंजी : संजय आंबे

        दि. १४ एप्रिल  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष आण्णा आवळे यांच्या हस्ते  प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, शहराध्यक्ष अॅड.अनिल डाळ्या, सरचिटणीस अमर कांबळे उपस्थित होते.

          यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री अनिल डाळ्या यांनी आपल्या भाषणात म्हणाले १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा दिवस  ज्ञानदिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ.आंबेडकर हे एक विख्यात सामाजिक कार्यकर्ते, अर्थशास्त्र, कायदेतज्ञ, राजनेता, आणि समाजसुधारक होते. अस्पृश्यता व जातीभेदच्या विरोधता संघर्ष केला. ते स्वातंत्र्य भारताचे पहिले न्यायमंत्री होते. १९१२ साली मुंबई युनिव्हर्सिटीमधुन पॉलिटिकलसायन्स आणि अर्थशास्त्रची डिग्री प्राप्त केली. अमेरिका, लंडन या दोन युनिव्हर्सिटीमधुन इकॉनॉमिक आणि अर्थशास्त्र यावर अभ्यासाचे ३२ डिग्री घेऊन जगातले सर्वात जास्त शिक्षण घेतले. बाबासाहेबांनी १ हजार दिवसात १६ हजार पुस्तके वाचून विश्व रेकॉर्ड केला. संयुक्त राष्ट्राने १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस विश्वज्ञान दिवस या रुपात मानायाची घोषणा केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातले प्रथम थोर नेते आहेत. त्याची जयंती प्रत्येक गल्लीत, गावात, शहरात, महानगरात, राज्यात, देशात आणि विदेशात केली जाते. जयंतीचा हा सण जगातला सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. २०मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळयाचे पिण्याचे पाणी खुले करून दिले. जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असलेल्या भारताची राज्य घटना २ वर्ष ११ महिने १८ दिवसात तयार केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांचे जन्म स्थळ, कर्मभुमी, शिक्षण भूमी तसेच लंडनमध्ये शिक्षण घेतलेले घर,चैत्रभूमी  हे पाचही ठिकण तीर्थस्थळ म्हणून घोषणा केली व विकसित करण्याचा निर्धार केला.

          सर्वसामान्य जनतेला मतदानाचा अधिकार मिळवून दिला, श्रीमंताला व  गरीब नागरिकाला एकच मतदान करण्याचा अधिकार ही फक्त आंबेडकरांच्या मुळेच मिळू शकला,भारतामध्ये जर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना नसती तर राजाच्या पोटी राजा जन्माला आला असता व देशामध्ये हुकूमशाही चालली असती, या राज्य घटनेमुळेच चहा विकणारा सर्वसामान्य व्यक्ती जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचू शकला असे उद्गार भाजपा ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजु यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

          सदर कार्यक्रमास ज्येष्ठ नेते धोंडीराम जावळे, पांडुरंग म्हातुकडे,मिश्रीलाल जाजु, विनोद कांकानी, तानाजी पोवार, राजेंद्र पाटील, अरविंद शर्मा, अरुण कुंभार, किसन शिंदे, सुनील महाजन, मनोज साळुंखे, पै.अमृता भोसले, महिला अध्यक्षा सौ.पुनमताई जाधव, सौ अश्विनी कुबडगे, सौ.अलका विभूते, सौ.मोरे, ऋषभ जैन, अॅड.भरत जोशी, अमित जावळे, सागर कचरे, प्रदीप माळगे, प्रविण पाटील, दिपक राशीनकर,शशिकांत मोहिते, अरविंद चौगुले, हेमंत वरुटे, सुजय पवार, संतोष कोळी, अमित जावळे, अर्जुन सुतार, प्रितम बोरा, शिवदीप बंडगर, कृष्णात सातपुते, अशोक साळुंखे, प्रितम लोटके, अभय बाबेल, शंकर झित्रे, सुर्यकांत कोकरे, लालचंद पारीख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.