नागपूर .नंददत डेकाटे
दि. ५ मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ध्वजारोहण करुन शुभेच्छा दिल्या. या समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत साहेब यांच्या हस्ते उमरेड येथील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारा युवा मोनिष महेंद्र अठ्ठरकर यांना जिल्हा युवा पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले . या मध्ये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच 10 हजाराचे रोख बक्षिस देण्यात आले.
या वेळी विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यावेळी उपस्थित होते. मागील पाच वर्षांपासून मोनिष अविरत युवक कल्याण विषयक सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहात तालुक्यातील गावगावत स्वछता अभियान – श्रमदान कार्यक्रम, बेटी बचाव बेटी पढाओ जनजगृती , नवीन मतदान नोंदणी व मतदान जनजगृती , वृक्षारोपण – वृक्षसंवर्धन , तहसील मधील युवाच्या व्यक्तीमत्व विकास व्हावा या करिता अनेक कृतिशील उपक्रम – कार्यक्रम , प्लॅस्टिक संकलन मोहीम , ग्रामीण भागातील शाळेत शालेय साहित्य वितरण, संमोहित रक्षबंधान , रक्तदान शिबिरे , पशु-पाखरासाठी जलपत्र लावण्याची मोहीम , महापुरुषांच्या जयंती – पुण्यतिथी निमित्याने अनेक समाज उपयोगी कार्यक्रम , महिला सक्षमीकरण एड्स जनजगृती , क्रीडा साहित्याचे वितरण , हुंडाबळी जनजगृती कार्यक्रम , पोषण पंधरवडा ,ग्रामीण भागातील मुलींना कायदेशीयक मार्गदर्शन कार्यक्रम , व्याख्यान कार्यक्रम , समाजात जनजगृती कार्यक्रम , कोरोना काळात उल्लेखनिय कार्य केले आहे.