यड्राव: विजय घंगेकर
दि.13 यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोक्रॅट 2022 या राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धेला महाराष्ट्र, कर्नाटक व सीमाभागातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत 622 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घघाटन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य बी. एस. ताशीलदार, सर्व डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थीत होते.
श्री. बागणे म्हणाले, या स्पर्धेमुळे सहभागी विद्यार्थ्यांमधून नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि नवउदयोजक विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमठवतील. शरद पॉलिटेक्निकलने अशा विध्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.
या स्पर्धेत इलेक्ट्रिकल विभागात शरद पॉलिटेक्निकच्या “इंडस्ट्रीअल एअर क्वालिटी मॉनिटर अॅण्ड कंट्रोल युजींग सोलार पॉवर” या प्रकल्पास, मेकॅनिकल विभागात “आयओटी बेस्ड व्हर्च्युअल डॉक्टर रोबोट” या प्रकल्पास, सिव्हिल विभागात शरद पॉलिटेक्निकच्या “ग्रीन कॅम्पस डेव्हलपमेंट” या प्रकल्पास, कॉम्प्युटर विभागात “आयसीयु मॉनिटरिंग सिम” या प्रकल्पास, आय टी विभागात शरद पॉलिटेक्निकच्या “ऑटोमेटीक इरिगेशन सिस्टीम युजींग आयओटी” तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात “इनोव्हेटीव्ह फ्युचरिस्टीक इव्ही चार्जिंग स्टेशन युजींग एआय इम्पलीमेंटेंशन्स विथ झिरो कार्बन इमिशन्स” या प्रकल्पांना प्रथम क्रमांक मिळाला. यावेळी द्वितीय व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे मिनी प्रोजेक्ट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. स्पर्धेचे समन्वय प्रा. ए.के. मगदूम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आर.आर. पाटील यांनी केले. आभार एस.एस.माळी यांनी मानले.