उमरेड : प्रतिनिधी
दि. १८ मेे. रमाई बहुउदेशिय महिला विकास मंडळ ,कावरापेठ, उमरेड येथे बुद्ध जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गौतम बुद्ध .महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण सोमेश माटे यांनी केले. व पंचशिल ध्वजारोहन व बुद्धवंदना घेण्यात आली.
यावेळी गोड खीर वाटप करण्यात आली. व सायंकाळी कँडल माँर्च काढण्यात आला. भिमगीत गाऊन आंनद उत्सव साजरा केला.तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनपटावर सोमेश माटे यांनी प्रकाश टाकला. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अविनाश बहादुरे .राजकुमार लोखंडे .तरुण तांबे .भारत रामटेके .निलेश बोरकर .विकाश गणविर .साहिल माटे .पंकज लोखंडे यशवंत गणविर. आचल पाटील. सुषमा तांबे .मीना लोखंडे .माया झोडापे. मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन राजकुमार लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमेश माटे यांनी मानले .