रत्नागिरी जिल्ह्याच्या काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे यांची निवड

 

संगमेश्वर : सचीन पाटोळे
संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि हिरीरीने प्रत्येक विषयामध्ये सहभाग दाखवणारे काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पेळणारे अनिरुद्ध कांबळे यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.अनिरुद्ध कांबळे यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या काँग्रेस पक्षाला बळ येणार असून संगमेश्वर तालुक्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता काँग्रेस पक्ष बळकट होण्यासाठी अनिरुद्ध कांबळे पुन्हा एकदा यशस्वी ठरणार आहेत.
. रत्नागिरी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याची धुरा अविनाश लाड यांच्या वरती सोपविल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला एक नवीन ऊर्जा मिळाली.अविनाश लाड यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागले आहेत काँग्रेस पक्ष बळकट व्हावा यासाठी जिल्ह्यामध्ये विविध पदांची रचना करून नवीन नवीन नियुक्ती नवनियुक्त लोकांना संधी देण्यात आली आहे.अनिरुद्ध कांबळे यांनी गेली 13 वर्ष कॉग्रेसच्या अनुसूचित जाती जमातीच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा संभाळी होती.त्यामध्ये सामाजिक काम करत असलेल्या आणि पक्षासाठी अहोरात्र काम करत असलेले अनिरुद्ध कांबळे यांचा प प्रदेशकमिटी वरून वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी नाव सुचवले नंतर त्यांना मान्यता मिळून आज अनिरुद्ध कांबळे हे रत्नागिरी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी काम करणार आहेत. सामाजिक,कला,क्रीडा, पर्यावरण,आरोग्य, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत असलेले अनिरुद्ध कांबळे हे तळागाळातील लोकांपर्यंत पोचून समाजातील आणि लोकांमधील शेवटच्या घटकातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी अनिरुद्ध कांबळे सहभागी होत असतात. समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी अनिरुद्ध कांबळे यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम असतील,उपोषण असतील,आंदोलन असतील या माध्यमातून पक्षाला बळकटी आणि नवीन उंमदे कार्यकर्ते निर्माण करण्याचे काम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनिरुद्ध कांबळे यांच्या माध्यमातून झाले आहे.
. रत्नागिरी जिल्ह्याच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे यांची निवड झाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचा वातावरण निर्माण झाला असून कार्यकर्ते मध्ये उत्साह निर्माण झाला आहे.अनिरुद्ध कांबळे यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगला बळकट होईल आणि चांगल्या पद्धतीने काँग्रेस पक्षाला यश मिळेल असेही प्रत्येक ठिकाणी बोलले जात आहे.