कबनूर : चंदूलाल फकीर
दि. ५ जून : कबनूर ग्रामपंचायत ,महिलांची झाडांची भिशी, शांतिनाथ पतसंस्था व इंदिरा महिला पतसंस्था यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 5 रोजी नालंदा परिसर समाज मंदिर कबनूरच्या कम्पाऊंडमधील आवारात ग्रामपंचायत मार्फत १०० झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले .
येथील सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कबनूर मधील शांतिनाथ पतसंस्था यांचेमार्फत ५० झाडे व इंदिरा महिला पतसंस्थेचे मार्फत ५० झाडे असे १०० झाडे देण्याबाबत महिला मंडळाने आव्हान केले होते त्याप्रमाणे दोन्ही संस्थेमार्फत पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कबनूरमध्ये कबनूरचे ज्येष्ठ नेते पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम.पाटील, सरपंच शोभा पोवार , उपसरपंच सुधीर पाटील, सदस्य मधुकर मणेरे, समीर जमादार,सुधीर लिगाडे, रजनीताई गुरव, पाटील वहिनी, कट्टी वहिनी, मिलिंद कोले, डॉक्टर मिता पाटील, सौ .मंगल काडाप्पा, सौ.स्वाती कोले, अशोक पाटील, सुभाष काडाप्पा सर, बाळासाहेब केटकाळे,रमेश केटकाळे, बबन केटकाळे, आदि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी झाडांचे भिशी महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर ज्योती बडे,शांतिनाथ पतसंस्थेचे चेअरमन मिलिंद कोले, इंदिरा महिला पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर मिता पाटील यांचा ग्रामपंचायत मार्फत झाडाचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.डॉक्टर कोळी मॅडम, उपसरपंच सुधीर पाटील,ज्येष्ठ नेते अशोक पाटील सरपंच शोभा पोवारमॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. याचं कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायतीचे कर्मचारी विठ्ठल यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना झाडाचे रोप देऊन वाढदिवसाच्या सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास ग्रामपंचायत मौजे कबनूरचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी, झाडांची भिशी महिला मंडळाचे सर्व सदस्य, शांतिनाथ पतसंस्था व इंदिरा महिला पतसंस्थाचे पदाधिकारी, कबनूर मधील विविध मंडळ व संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते ,नालंदा परिसर समाज मंदिरचे पदाधिकारी व ग्रामस्थ हजर होते.