कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.१८ जून : चंदगड पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे वय वर्षे 34 मूळ राहणार मु. पो. खोतवाडी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ,सध्या राहणार आर जे पाटील गणेश फर्निचरच्या मागे , मजरे कार्वे ता. चंदगड जि. कोल्हापूर .यांच्या घरी भाड्याने. अमित पांडे यांनी तक्रार याच्याकडे तक्रारदार व त्यांच्या वडिलांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या कामे मदत करण्याकरिता त ५० हजार लाचेची मागणी केली. तडजोडी अंतर्गत 40 हजार रू लाच पैकी पहिला हप्ता २० हजार रुपये स्विकारत असताना अमित पांडे यास तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी प्रमाणे लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले .
विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री राजेश बनसोडे ,पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, श्री सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक लाप्रवी पुणे .यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी श्री आदिनाथ बुधवंत पोलीस उपअधीक्षक लाप्रवी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन कुंभार पोलीस निरीक्षक ,पोलीस नाईक सुनील घोसाळकर नवनाथ कदम ,पोलीस कॉन्स्टेबल संदीप पडवळ ,मयुर देसाई ( वाहन चालक )पोलिस हेडकॉन्स्टेबल सुरज अपराध ला प्र वि कोल्हापूर या पथकाने ही कारवाई केली