कोल्हापूर : प्रतिनिधी
दि 2 जुलै : येत्या 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण होत आहेत त्या अनुषंगाने Railway Protection Force आरपीएफचे प्रमुख संजय चन्दर, ( DG/RPF ) अजय सादानी,उदय सिंह पवार, (वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ ) यांच्या आदेशानुसार आजादी का अमृत महोत्सव दिनांक 1 जुलै पासून साजरा करण्यात येत आहे .
याचे औचित्य साधून विजय शंकर मांझी, निरीक्षक आरपीएफ ठाणे ,कोल्हापुर यांच्याद्वारे आज शनिवार रोजी कोल्हापुर शहरामध्ये Two Wheelers Rally ( दुचाकी रॅली ) व चारचाकी वाहनाद्वारे रॅली काढून आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी आर. के. यादव-सहायक विभागीय अभियंता पुणे विभाग, विजय कुमार-स्टेशन अधीक्षक कोल्हापुर, विजय पार्टे- स.उप निरी व आरपीएफ चे कर्मचारी – संजय कांबळे, रमेश टोमके, शरद कांबळे, शिवाजी नरुटे, एल. टी. गुरव, डी. बी. पाटील तसेच 1098 चाइल्ड हेल्प लाइनचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.