आ.प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परस्थितीची घेतली माहिती

इचलकरंजी : संजय आंबे

दि. ६ जुलै :राधानगरी, कोयना धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत होत असलेली वाढ या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परस्थितीची माहिती जाणून घेतली. पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालल्याने नदीकाठावरील तसेच मळेभागातील नागरिकांनी सतर्क रहावे, अशा सूचनाही आमदार आवाडे यांनी यावेळी केल्या.
मागील चार दिवसांपासून कोकण भागासह धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. तर जिल्ह्यात येत्या 9 जुलैपर्यंत पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालली असून ती 57 फुटापर्यंत पोहोचली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर बुधवारी सायंकाळी आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीकाठी प्रत्यक्ष भेट देत पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बोट क्लबच्या सदस्यांना बोलावून उद्भवणारी परिस्थिती पाहता आवश्यक त्या साहित्यासह सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. तसेच पूराचा सामना करण्यासाठी ज्याची गरज भासेल त्याची पूर्तता आपण करुन देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पाणी पातळीत गतीने वाढ होत चालल्याने नदीकाठावरील शेतकरी, नागरिक तसेच मळेभागातील नागरिकांनी सतर्क रहावे. प्रशासनाकडून मिळणार्‍या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले आहे.