नियोजन विभागाचा गौरव

रत्नागिरी : शब्बीर मजगावकर

दि.  २५ : ग्रामविकास व पंचायत राज विभाग-उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत राज्यातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकरिता ग्राम योजना राज्यस्तरीय संकल्प परिषद  प्रथमच नवी मुंबई येथे आयोजित केली होती.  या बैठकीमध्ये अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य समन्वयक सांसद आदर्श ग्राम योजना डॉ. हेमंत वसेकर (भाप्रसे) यांचे हस्ते रत्नागिरी जिल्हा सांसद आदर्श ग्राम योजनामध्ये उत्कृष्टपणे काम करतो यासाठी  उमेश मगदूम लेखा अधिकारी आणि संजय पालव,  सहायक संशोधन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी  या दोघांचा यथोचित सत्कार शुक्रवार 22 जुलै 2022 रोजी करण्यात आला.

सदर बैठकीत  परमेश्वर राऊत मुख्य परिचलन अधिकारी  आणि राजीव जोगदंड उमेद आणि इतर  नियोजन अधिकारी उपस्थित होते. तसेच सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत खासदार श्री विनायक राऊत आणि जिल्हाधिकारी डॉ. बीएन.पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी  जाखड यांचे वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शन आणि सर्व BDO यांचे यथोचित सहकार्य लाभले.