बालवाडीत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन

कब नूर येथील बालवाडीत माह निमित्त पोषण आहार कार्यक्रम संपन्न

कबनूर : कबनुर (ता.हातकनगले) येथील बाल विकास सेवा योजना प्रकल्प हातकणंगले -२ साजणी बीट अंतर्गत अंगणवाडी मध्ये पोषण माह निमित्त पोषण आहार कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
         यावेळी पर्यवेक्षिका श्वेता शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली कबनूर मधील २२ अंगणवाडी मधील सेविकांनी एकत्र येऊन पोषण प्रतिज्ञा, पोषण आहारा संबंधी घोषणा, पोषण साखळी, पोषण आहारा संबंधी संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या, कडधान्याच्या कलाकृती आदि मधुन पोषण तत्वांचे महत्व, पौष्टीक पाककृती सादर केल्या व पोषण आहार कसा व केंव्हा द्यावा, आहार व आरोग्या बाबत माहिती, किशोरी मुलींचे पोषण, कुपोषण  मुक्त अंगणवाडी व कुपोषण मुक्त गांव होण्यासाठी उपयुक्त माहिती दिली.
           याकामी प्रकल्प अधिकारी विद्या माने यांचे मार्गदर्शन तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य लाभले. सेविका सौ. सुवर्णा शेटे यांनी स्वागत केले. सौ. शोभा पांडव यांनी आभार मानले. यावेळी किशोरी मुली,महिला उपस्थित होत्या.