12 ते 14 वयोगटातील शाळकरी मुलांचे कोविड-19 लसीकरण सुरुवात

रत्नागिरी /मेहरुनिसा साखरकर
12 ते 14 वयोगटातील साधारणत: सहावी ते आठवीत शिकणाऱ्या मुलांसाठी आज दिनांक 21-03-2022 रोजी कोविड-19 लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.12 ते 14 वयोगटातील शाळकरी मुलांचे कोविड-19 लसीकरण कोर्बेवॅक्स लसीचा डोस देऊन करण्यात आले. सदरचा शुभारंभ कार्यक्रम नागरी आरोग्य केंद्र कोंकणनगर, रत्नागिरी येथे मा.डॉ.अनिरुध्द आठल्ये- जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे प्रमुख उपस्थितीत, डॉ.महेंद्र गावडे- तालुका आरोग्य अधिकारी, पं. स. रत्नागिरी व डॉ. परिमल आर. गोडे नागरी आरोग्य केंद्र कोंकणनगर यांचे सहउपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला.
कोव्हॅक्सिनप्रमाणेच कोर्बेवॅक्स लसीचे दोन डोसमधील अंतर चार आठवडेच राहणार आहे. 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2010 मध्ये जन्मलेल्या सर्व मुलांना ही लस घेता येणार असुन, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व शाळांमध्ये ही लस देण्यात येणार असल्याचे मा.डॉ.अनिरुध्द आठल्ये- जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोविड-19 लसीकरण आपल्या मुलांचे करुन, नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.