आरवली: सचिन पाटोळे
दि २५ ऑक्टोबर २०२६ : नुकताच चिपळूण शहरातील हॉटेल साईशा येथे झालेल्या एका कार्यक्रमात चिपळूण तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला . मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला .यावेळी चिपळूण तालुक्यातील दळवटणे, वालोपे,निरबाडे, वालोटी याभागातील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप च्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला .
सर्वप्रथम शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य प्रवेश सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पक्ष प्रवेश करून उपस्थीत प्रवेशकर्त्यांना कीर्तनकार ह.भ.प श्री. तांबिटकर महाराज,प्राध्यापक टेरवकर यांच्यासह मनसे पदाधिकारी यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी प्रवेशकर्त्याना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ निवेदक शहीदभाई खेरटकर यांनी केले तसेच कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी,याप्रसंगी माथाडी कामगार सेनेचे सरचिटणीस रविकांत काणेकर, शेतकरी सेनेचे जिल्हा सचिव जितेंद्र महाडिक, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर ,वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, माजी तालुका प्रवक्ते संदेश साळवी,महिला उपाध्यक्षा स्मिता पावसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते .