इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त ( अश्विन पौर्णिमा या तिथीनुसार ) विनम्र अभिवादन

इचलकरंजी : अन्वर मुल्ला 

दि.२६: इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि.२६ ऑक्टोंबर रोजी महर्षि वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त (अश्विन पौर्णिमा या तिथीनुसार ) महानगर पालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी नगरसेवक योगेश पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परिक्षक आरती खोत, शिक्षण अधिकारी बी.एम.कासार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे, वाल्मिकी समाज अध्यक्ष राजु रजपुते, सहा.आयुक्त सुनिल शिंदे, सहा.आयुक्त रामचंद्र कांबळे, सहा.आयुक्त नितिन बनगे, सहा.आयुक्त सदाशिव गोनुगडे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, अधिक्षक गणेश शिंदे, सहा कर संकलन अधिकारी दिपक खोत, उद्यान व वनसंवर्धन विभाग प्रमुख प्रशांत आरगे, संदीप जोशी, संगणक विभाग प्रमुख अजय जाधव, विधी अधिकारी भावना देवडा, आपत्ती व्यवस्थापनाचे संजय कांबळे, महादेव देसाई, सचिन शेडबाळे आदींसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.