जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर¸ इचलकरंजी 36 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ.

इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १५ डिसेंबर :कबनूर एज्युकेशन सोसायटी संचलित जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर¸इचलकरंजी. या प्रशालेच्या 36 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवास दिमाखदार प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जयकुमार कोले हे होते.

प्रारंभी क्रीडाज्योत प्रज्वलन राष्ट्रीय खेळाडू व विक्रीकर निरीक्षक मा.श्री.मुकुंद वाडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण दे.भ रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.पी.एम.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जयकुमार कोले व सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांना एम.सी.सी विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका सौ. के. यु. पोतदार यांनी केले. यावेळी मान्यवरांचा व जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळविलेल्या खेळाडूंचा¸मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे मा.श्री.डॉ.विठ्ठल पाटील¸ मा.श्री.मुकुंद वाडकर¸ मा.श्री.निलेश रंगाटे यांनी विद्यालयाच्या प्रगतीबाबत व शिस्तीबाबत कौतुक केले. पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन. मा.श्री.पी.एम.पाटील यांनी जवाहरनगर हायस्कूलचा इतिहास सांगून गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची प्रगती कौतुकापद आहे असे सांगितले. संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.सुभाष काडाप्पा सर यांनी शालेय इमारतीची सुसज्जता क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. जयकुमार कोले यांनी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था अहोरात्र कष्ट घेत आहे याचा विद्यार्थी पालक व शिक्षकांनी फायदा घेऊन पुढील काळात या परिसरातील दर्जेदार शाळा असा नावलौकिक निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यxa मा.श्री.राजाराम वाकरेकर¸ संस्थेचे संचालक मा.श्री.सुरेंद्र केटकाळे¸ मा.श्री.महावीर केटकाळे कबनूर हायस्कूलचे मुख्याध्यापक मा.श्री.पी. डी.चौगुले ¸ साजणी हायस्कूलचे मुख्याध्यापक मा.श्री.एस.एन पाटील¸ प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती. सुप्रिया नोरजे ¸ विद्यालयाचे पर्यवेक्षक मा.श्री .एस.पी जाधव¸जिमखाना प्रमुख श्री ऐनापुरे बी.टी ¸ सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री कांबळे ए. एस. बालवाडी विभाग प्रमुख सौ.सपाटे मॅडम ¸ सर्व शिक्षक-शिक्षिका¸शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार क्रीडा विभाग प्रमुख श्री.पताडे पी.बी यांनी मानले तर सूत्रसंचालन सौ संगीता चव्हाण एस.बी. व सौ. पाटील एन.एस ¸ श्री .माने ए एन. यांनी केले.