कबनूर : दिपक पाटील
दि. १५ डिसेंबर कबनूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री. सुभाष काडाप्पा सर यांची इचलकरंजीतील आदिनाथ सहकारी बँकेच्या चेअरमनपदी फेरनिवड झाली त्याबद्दल, कबनूर एज्युकेशन सोसायटीतर्फे कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. जयकुमार कोले यांच्या अध्यक्षतेखाली,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. पी. एम. पाटील( चेअरमन पंचगंगा सहकारी साखर कारखाना..) यांच्या शुभहस्ते मा. श्री. सुभाष काडाप्पा यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. राजाराम वाकरेकर, संस्थेचे संचालक मा. श्री. सुरेंद्र केटकाळे, मा. श्री. महावीर केटकाळे, कबनूर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पी. डी. चौगुले, साजणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. पाटील, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. नोरजे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. के. यू. पोतदार यांनी केले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एस. पी. जाधव, जिमखाना प्रमुख श्री. बी. टी. ऐनापुरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. ए.एस. कांबळे सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए. एन. माने, सौ. एस. बी. चव्हाण यांनी केले. आभार श्री. पी. बी. पताडे यांनी मानले..