इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि १९ :येथील दि लक्ष्मी को – ऑप. प्रोसेसचे चेअरमन मुकुंद फाटक यांचे चिरंजीव सर्वेश मुकुंद फाटक यांचे शनिवार दि.१७ रोजी रात्री ह्रदय विकारान मुंबई येथे दु:खद निधन झाले.ते ३३ वर्षाचे होते.
सर्वेश फाटक यांचे केसरी ढोल पथकाच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान होते. तसेच भारतातील निरनिराळ्या ठिकाणी मोटरसायकलने प्रवास करुन भेटी देण्याचा त्यांचा छंद होता. त्यांच्या मागे आई, वडील, विवाहीत बहिण, पत्नी व बराच मोठा मित्रपरिवार आहे.