शरद कृषिच्या विद्यार्थ्याची फुटबॉल संघात निवड

जैनापूर,: प्रतिनिधी

दि. १७ :जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषि महाविद्यालयमधील संयम सुहास पाटील यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. जबलपूर (मध्यप्रदेश) येथील राणी दुर्गावती विश्वविद्यालयमध्ये पश्चिम विभागीय फुटबॉल स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठात पार पडली. त्यामध्ये संयम याची निवड करण्यात आली.

संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी कु. संयम पाटील यांचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्य‍ालयाचे प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे, क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले