क्लाऊड अँड एज कॉम्प्युटिंग मध्येरोजगाराच्या वाढत्या संधी: डॉ. राजकुमार बुय्या

घोडावत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

जयसिंगपूर:प्रतिनिधी 

दि २ जानेवारी :कॉम्प्युटर संबंधित शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना क्लाऊड अँड एज कॉम्प्युटिंग मध्ये जागतिक स्तरावर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. राजकुमार बुय्या यांनी घोडावत विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय क्लाऊड अँड एज कॉम्प्युटिंग कार्यशाळेत केले.

  या कार्यशाळेत क्लाऊड कॉम्प्युटिंग अँड डिस्ट्रीब्यूटेड सिस्टीम लॅबोरेटरी युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न ऑस्ट्रेलियाचे संचालक डॉ. बुय्या यांनी यावेळी प्रशिक्षण देताना क्लाऊड कॉम्प्युटिंग मधील संशोधनाच्या  संधी विषयी आणि  उपयोगितेविषयी प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले. क्लाऊड चे विविध अप्लिकेशन्स बाजारात येत आहेत. येणाऱ्या काळात याची मागणी वाढणार आहे. त्याप्रमाणे कौशल्यपूर्ण कामगारांची गरज देखील यासाठी लागणार आहे. यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आवश्यक आहेत असे ते म्हणाले.

                या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठातील स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागातर्फे करण्यात आले. हैदराबाद विद्यापीठाचे प्रो. सतीश श्रीरामा यांनी हल्ली मनुष तंत्रज्ञानाच्या साह्याने स्मार्ट जीवन कसे जगू शकतो हे स्पष्ट केले. तर क्लाऊड कॉम्प्युटिंगचे प्रमाण वाढत असल्यामुळे संशोधना क्षेत्रात मोठी संधी असल्याबद्दल सांगितले. व्हीएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ऑस्ट्रियाचे डॉ. शशिकांत लॅगर यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स ची पद्धत क्लाउड कॉम्पिटिंग मध्ये प्रभावीरीत्या कशा पद्धतीने वापरता येऊ शकते हे सांगताना भविष्यातील आव्हाने आणि संधींबाबत माहिती दिली. एन.आय.टी.के सुरतकल मेंगलोरचे प्रो. चंद्रशेखरन के. यांनी क्लाऊड कॉम्प्युटिंग मध्ये डेटा चे महत्व त्याची सुरक्षितता, गुणवत्ता आणि वापरा विषयी माहिती दिली. तर युनिव्हर्सिटी ऑफ टाटू इस्टोनिया चे संशोधक शिवानंद पुजार यांनी विद्यार्थ्यांना अनेका क्लाऊड प्रत्यक्ष हाताळण्यास दिले.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी सर्व प्रशिक्षकांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, की ही आंतरराष्ट्रीय कार्यशाळा विद्यार्थी- शिक्षकांना भविष्यात खूप उपयोगी पडेल. आंतरराष्ट्रीय तज्ञ मार्गदर्शकांनी दिलेले हे प्रशिक्षण रोजगार आणि विद्यापीठाच्या गुणवत्ता वाढीमध्ये मदत करेल अशी आशा व्यक्त केली.

                या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाचे प्रमुख बी. सुरेश यांनी सर्व प्रशिक्षकांचे आणि प्रशिक्षणार्थींचे आभार मानले. या कार्यशाळेत 200 विद्यार्थी-शिक्षकांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी कार्यशाळेच्या समन्वयक दीपिका पाटील आणि सुरभी गायकवाड यांच्या कामाचे कौतुक केले. तर संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, अकॅडमीक डीन डॉ. उत्तम जाधव यांनी ही कार्यशाळा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.