गोकुळश्री’ स्पर्धेत लिंगनूर क.नूलच्‍या सौ. अर्चना खांडेकर यांची म्‍हैस प्रथम तर सरवडेचे श्री. शांताराम साठे यांची गाय प्रथम क्रमांक प्राप्‍त.

कोल्‍हापूरःप्रतिनिधी 

दि.०१. गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते, सन २०२२-२३ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेमध्‍ये एकूण ८० म्‍हैस व गाय दूध उत्‍पादकांनी उत्‍साहाने भाग घेतल्‍याने स्‍पर्धेत चुरस निर्माण झाली होती. सदरची स्‍पर्धा दिनांक २३/११/२०२२ ई रोजी घेण्‍यात आली असून, त्‍यामध्‍ये अरुंधती महिला सह.दूध व्‍याव. संस्‍था लिंगनूर क.नूल ता. गडहिंग्‍लज म्‍हैस उत्‍पादक सौ.अर्चना उमेश खांडेकर यांच्‍या म्‍हैशीने एका दिवसात २०.१४० लि. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला तर गार्इमध्‍ये मा .आम.कै.किसनराव मोरे सह.दूध व्‍याव. संस्‍था सरवडे ता.राधानगरी येथील गाय उत्‍पादक श्री. शांताराम आनंदा साठे यांच्‍या गायीने ३५.०८०लि. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.

गोकुळशी सलग्‍न असणा-या सर्व प्रथमिक दूध संस्‍थांच्‍या सभासदां करीता या स्‍पर्धा प्रतिवर्षी घेण्‍यात येतात. ‘गोकुळश्री’स्‍पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणे,जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्‍ये दूध उत्‍पादन वाढवणे याचबरोबर दुग्‍ध व्‍यवसायामधुन दूध उत्‍पादकांना जास्‍तीत-जास्‍त लाभ करून देणे तसेच तरूण पिढीला या व्‍यवसायकडे आकर्षित करून दूध व्‍यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्‍पर्धा गोल्‍या २९ वर्षापासून आपल्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये सुरू केलेली आहे.