यड्राव,:प्रतिनिधी
दि .1 दत्तवाड (ता.शिरोळ) येथील शरद किडसमधील 28 विद्यार्थी विज्ञान ऑलंम्पियाड फाऊंडेशन (SOF) यांच्याकडून घेण्यात येणा-या इंटरनॅशनल गणित ऑलंम्पियाड (IMO)स्पर्धेत यश मिळविले आहेत.यामध्ये पहिलीच्या श्रेयस संदीप पाटील याने गोल्ड मेडल ऑफ एक्सलेन्स तर दुसरीच्या आरव भागटे, अनन्या परीट, मनस्वी सिदनाळे, दर्शन पांढरबळे, पियुष मोकाशी, मयंक शेट्टी, सौम्या अंबुपे, प्राप्ती पाटील यांनी इंटरनॅशनल गोल्डमेडल मिळवले आहे. शुभ्रा अंबुपे हिने इंटरनॅशनल सिल्व्हर मेडल आणि प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस मिळवले आहे. तसेच यश चौगुले याने मेडल ऑफ डीस्टीनकशन तर प्रणम्या मलिकवाडे हिने गोल्ड मेडल मिळवले.तिसरीच्या मीरा पटेल, श्रेयस गळगे, अनविका कांबळे, आदिनाथ सिदनाळे, ऋतुराज आलासे,त्रिशा हिरीकुडे, विनायक कमते या सर्व विद्यार्थ्यानी मेडल ऑफ डीस्टीन्कशन मिळवले आहे.अर्णव भातमारे याने गोल्ड मेडल ऑफ एक्सलेन्स तर चौथीच्या शुभ्रा पाटील, आदित्य मगदुम,पहिलीच्या वेदांत माळी, रिया निर्मळे, आरुष नेजे, यशस्वी पाटील, प्रणव पाटील यांनी स्टुडंट परफॉर्मन्स मिळविला आहे.जगातील 32 देशात ह्या परिक्षा होतात. यावर्षी देशातील 42 हजारपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. परिक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ.
राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.