जयसिंगपूर :प्रतिनिधी
दि १:जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषि महाविद्यालयामधील खेळाडू कु. ओम शिंदे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. सीकर (राजस्थान) येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठ, येथे पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे झाल्या.संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी कु. ओम शिंदे यांचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे, क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.