कबनूर ‘ दि ११ :बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मणेरे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा चि. आदित्य आनंदा पाटील याने 1500 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करून गोल्ड मेडल पटकावले. तसेच 3000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच आळते येथे झालेल्या पुरुषांच्या खुल्या गटातील मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून ट्रॉफी व रोख रक्कम २०००/- प्राप्त केले. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे संस्थेचे संस्थापक श्री. सुधाकररावजी मणेरे (काका) यांनी अभिनंदन केले. त्याच्या या यशामुळे मणेरे शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यानिमित संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुभाष केटकाळे (काका), प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कु. तसलिम मणेर, उपमुख्याध्यापिका पुष्पा ऐनापुरे , हायस्कूल व कॉलेजच्या प्राचार्या सौ.उर्मिला माने, उपमुख्याध्यापिका सौ. संगिता व्ह्नबटटे् या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. सदर खेळाडूस क्रीडा शिक्षक श्री. मलिक मणेर यांचे मार्गदर्शन लाभले.