पहिल्याच पावसातच (सावरकर नगररोड नं.३३) नवीन बांधलेली भिंत खचली. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता

ठाणे:प्रतिनिधि

दि:२९:जुन:सावरकर नगर येथील रस्तरुंदिकरंच्या नावाखाली बांधलेले भिंत खचल्याने नागरिकांच्या मनात भीती मोठी दुर्घटना होण्याची शक्यता

‘प्रभाग क्र.१५ स्वा.सावरकर नगर,

रोड नं.३३ मध्ये रस्तारुंदीकरणाच्या

नावाखाली बांधलेली भिंत खचल्याचे

समोर आले आहे.

‘ पहिल्याच पावसात जर असे चित्र

असेल तर पुढे काय हा प्रश्न येथील

रहिवाशांना पडला आहे.

नागरिकांशी संवाद साधता  नागरिकांचा म्हणणं आहे की

लोकप्रतिनिधीचा रहिवाशांशी

संवाद नाही, ठेकेदारांचा मनमानी कारभार,

निकृष्ठ दर्जाची कामे , एकंदरीत आधीच

मेटाकुटीला आलेल्या वागले इस्टेट,

सावरकर नगर, मधील नागरिकांना कोणी

वाली राहिले आहे. आता आम्हाला

पावसाच्या पाण्यात दुर्घटना घडून आम्ही

नेस्त नाबूत कधी होणार याची वाट

प्रशासन पाहात आहे का.

येथील नागरिक प्रशासन व सत्ताधारी राज्यकर्त्यांवर नाराज आहेत

तसेच  ठाकरे गटातील शिवसेना विभागप्रमुख –

प्रतिक राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी

सदर भागाचीपाहणी केली.

व सत्ताधारीवर थेट निशाणा साधला प्रतीक राणे महणाले की

आम्हाला तर लोकप्रतिनिधी

परिसराला आहे की नाहि हे माहित नाही

परंतु शहराला लाभलेले ठा.म.पा.

आयुक्त आता तरी लक्ष घालणार का ?

नाहितर रहिवाशांचा जीव गेल्यानंतर

सांत्वन करायला येणार असा प्रश्न

ठाणेकर नागरिक म्हणून आम्ही विचारत आहोत.

 

आज आव्हाड यांना ट्विटच्या माध्यमातून ठाण्याच्या आयुक्तांवर पाणी तुंबल्याने आरोप केला आहे

आव्हाडाने ट्विट केले: पहिल्या २ दिवसाच्या पावसातच ठाण्यात पाणी तुंबले आहे.असा प्रकार ठाण्यात कधीच होत नव्हता.विशेष म्हणजे नाले सफाईची पाहणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली होती.

“ठाण्यात पाणी तुंबनार,त्याकडे लक्ष द्या”,अशी विनंती मी अनेक वेळा ठाणे आयुक्त यांच्याकडे केली होती.परंतु मुख्यमंत्र्यांच्या “विशेष सेवेत” दंग असणाऱ्या आयुक्तांना याकडे लक्ष देण्यास बहुदा वेळ मिळाला नसावा.