मुंबई:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ)
दि:२७:जुलै:नवतरुण विकास मंडळ जांभवडे गुरववाडी, श्री लक्ष्मी माता नाच मंडळ आयोजित शक्ती,तुरा नाचाचे कॄष्णा बोलये, संतोष गुरव, महेंद्र गुरव यांनी एस एन डी टी कामा लेन घाटकोपर प. मुंबई येथे सर्व पदाधिकारी सभासद यांच्या वतीने आयोजन केले होते
शक्तीवाले शाहीर समीर मेटकर व तुरेवाले शाहीर भावेश बोलये यांनी सुंदर असा कार्यक्रम कोकणची लोककला सादर केली मंडळाच्या वतीने सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख, समाजसेवक-राजेंद्र स.भुवड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शाल , पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास मंडळा कडून शुभेच्छा देण्यात आल्या