डीकेटीई मध्ये टेक्सटाईल विभागाची पालक सभा थाटात संपन्न

इचलकरंजी: क़युम शेख 

दि  १ – येथील डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटच्या ऑडीटोरिएम हॉलमध्ये टेक्स्टाईल विभागातील पालक, विद्यार्थी व प्राध्यापक यांची एकत्रित अशी सभा उत्साहात संपन्न झाली.
दीपप्रज्वलनाने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण टीपीई कोऑर्डीनेटर प्रा. डॉ. एस.बी.म्हेत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. वाय.एम. इंडी व प्रा. यु.पी. म्हसवेकर यांनी केले. आर ऍण्ड डी डीन प्रा.डॉ. एस.बी.व्हनबटटे यांनी ‘अपॉर्चुनिटीज ऑफ हायर एज्युकेशन’ या विषयावर सविस्तर माहिती दिली.देशात व परदेशात तांत्रिक शिक्षणातील पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संधी या विषयाचा त्यांनी आढावा घेतला.
टेक्स्टाईलचे टीपीओ प्रा. संजय अकिवाटे यांनी टेक्स्टाईलच्या विद्यार्थ्यांच्या टे्निंग प्लेसमेंट विषयी अतिशय मुद्देसूद माहिती सादर केली व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या नोक-या मिळाव्यात यासाठी विद्यार्थी व पालकांकडून लागणारे सहकार्य व अपेक्षा व्यक्त केल्या. डीकेटीईचे उपसंचालक व टेक्स्टाईल विभागप्रमुख प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता व त्यांच्यामध्ये असणाˆया उणिवा यांचे ऍनालिसीस पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनव्दारे दाखवून त्यावर सविस्तर चर्चा केली तसेच बदलत्या काळाची गरज लक्षात घेवून पालकांनी आपली मानसिकता बदलावी असे नमूद केले व संस्थेचे विविध उपक्रम व यशोमालिका यांची सविस्तर माहिती दिली व पालकांच्या प्रश्‍नांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ. एम.सी.बुर्जी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.डॉ.वाय.एम. इंडी यांनी केले.