संगमेश्वर:सचिन पाटोळे
दि. २७. संगमेश्वर तालुक्यातील गडनदी मध्यम धरण प्रकल्प आणि गडनदी लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या राजिवली गावातील कांळबेवाडी पुनवर्सन संदर्भात प्रकल्प बाधित ग्रामस्थ व राजीवली पंचक्रोशीतील सुपुत्र व भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री सुर्यकांत साळुंके यांची कापसाळ चिपळूण येथे कांळबेवाडी पुनवर्सन अपुर्या जागेअभावी स्थगित राहीलेला विषयावर चर्चा करण्यात आली .
अजुन पर्यंत साळुंके यांनी पंचक्रोशीतील पुनर्वसन बाबतचे प्रश्न,गरज पडेल तेथे उपोषण, आंदोलन करून पंचक्रोशीतील जनतेला न्याय मिळवून दिला आहे.
जरी ते येथे स्थायिक नसले तरी पंचक्रोशीतील कोणत्याही व्यक्ती वर कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास ताबडतोब फोनवरून संबंधित ठिकाणी फोन करून समस्या मार्गी लावत आहेत.त्यांच्यावर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विश्वास असल्यामुळेच अजूनपर्यंत पंचक्रोशीतील जनता साळुंके यांच्या सोबत आहे.
या मिटींग मध्ये कार्यकारी अभियंता श्री जाधव यांनी कांळबेवाडी प्रकल्पग्रस्तांना चांगल्याप्रकारे माहिती देऊन सहकार्य केले.
यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री सुर्यकांत साळुंके, ग्रामपंचायत पाचांबे सरपंच संदेश घाडगे, पत्रकार सचिन पाटोळे,माजी सरपंच प्रशांत शिर्के, शांताराम मोरे,संजय पाटोळे, सुरेश गुरव, सदानंद कदम, संदीप शिर्के, आत्माराम शिर्के, तुकाराम मोरे, सोलकर आदी उपस्थित होते.