पत्रकार सचिन पाटोळे यांच्या बद्दल लिहिलेली बातमी अर्धवट माहितीची.

संगमेश्वर:प्रतिनिधी

दि २७:तालुक्यातील एका पत्रकाराने काही दिवसांपूर्वी आपल्या स्वतःच्या पोर्टल वरती बातमी लिहीली होती की राजीवली माजी सरपंच व माजी उपसरपंच यांनी घेतली (उबाठा) च्या कार्यकर्त्यांची भेट.(बीआर एस) नंतर शिवसेना (उबाठा) पदाधिकार्यांसोबत फोटो व्हायरल.
यावर राजीवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्री.सचिन पाटोळे यांनी आपली बाजू  मांडली आहे की ,२१ व्या शतकात तरी अजुन पर्यंत असा कायदा आलेला नाही की कोणाला भेटायला कोणाची परवानगी लागते . तसेच मैत्रीचे संबंध कोणी  कोणा बरोबरही ठेवायचे कि नाही ठेवायचे ,
लोकशाहीत कोणत्या ही व्यक्तिला कधीही, कोठेही कोणत्याही  भेटायला, बोलायला, फोटो काढायला अधिकार दिले आहेत.
परंतु एका स्वताला परिपूर्ण समजणाऱ्या  पत्रकारांनी संपूर्ण माहिती न घेता अर्धवट बातमी लिहीली आहे .
सन.२००७ ला सचिन पाटोळे हे शिवसेनेचे शाखाप्रमुख होते.त्यानंतर सन.२०१३ ला  सचिन पाटोळे यांच्या पत्नी शमिका पाटोळे यांना आपल्याच पंचक्रोशीतील सुपुत्र श्री सुर्यकांत साळुंके यांनी त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मधुन जिल्हा परिषद गट कडवई मध्ये उमेदवारी दिली.
राजिवली पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सुर्यकांत साळुंके यांनी पत्नीला उभे राहण्याची विनंती केली म्हणून त्यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या विनंती ला मान देऊन पत्नीला महाराष्ट्र नवनिर्माण सेने मधुन उमेदवारी देण्यास संमत्ती दिली.परंतु सचिन पाटोळे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलेला नव्हता. त्यानंतर ही सचिन पाटोळे शिवसेनेतच सक्रीय होते.
नंतर २०२२ मध्ये  महालक्ष्मी टाईम्स या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून  नियुक्ती झाल्यानंतर यापुढे कोणत्हीयाही  पक्षात प्रवेश करायचा नाही या विचारावर ठाम राहिले.त्यानंतर जाहीरपणे कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही.काही दिवसांनी संगमेश्वर तालुक्यातील काही त्यांचे जुने मित्रांसमवेत पुणे, जंगली महाराज रोड येथे बीआर एस पदाधिकारी यांची भेट घेऊन फोटो काढले मात्र कायदेशीर नियुक्ती पत्र नाही, किंवा आपण स्वतः तसे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले नव्हते. भेटायला गेल्यावर बीआरएस च्या पदाधिकार्यांनी गळ्यात प्रेमाने त्यांच्या पक्षाची शाल टाकली म्हणजे अधिकृत प्रवेश झाला असे सिद्ध होत नाही.
सन.२००७ पासून संबंधित व्यक्ती सोबत असलेले संबंध अजुन पर्यंत टिकवून ठेवणे म्हणजेच मैत्रीचे नाते सिद्ध होते.
आणि याच नात्याने व पत्रकार म्हणून महालक्ष्मी टाईम्स दिवाळी अंक देताना (उबाठा)च्या तालुका स्तरीय पदाधिकार्यांसोबत फोटो व्हायरल केला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बातमी लिहायला, फक्त राजकीय राग काढण्यासाठी संधी मिळाली.
आणि याच सामाजिक कार्यकर्ते कम पत्रकाराने राजकीय हेतूने बीआरएस तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री यांच्या बद्दल अपमानास्पद भाषेचा वापर करून आपल्या गावातील हाॅटसॅप ग्रृपवर आपली बुद्धी दाखवून दिली.
या अशा बातम्या फक्त राजकीय हेतूने आणि सुडबुद्धीने लिहील्या जात आहेत यांचा वापर सोशल मीडिया वरती पंचक्रोशीतील ग्रामस्थांना भडकवण्याचा प्रयत्न काही सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे सदर बुद्धिजीवी पत्रकाराने बातमी लिहिणे व प्रकाशित करण्यापूर्वी  अर्धवट बातमी करण्यापूर्वी माहिती घ्यावी असेही म्हंटले.