देवरुख : सचिन पाटोळे
दि २९ :संगमेश्वर तालुक्यातील ग्रृप ग्रामपंचायत राजीवली मधील जिल्हा परिषद शाळा कुटगीरी साठी १५ वा वित्त आयोग मधुन शाळा संरक्षण भिंत गेटसह दुरुस्ती करणे,या कामासाठी ८५ हजार रु. इतका निधी खर्च करून बांधकाम करण्यात आले होते. अवघ्या ६ महिन्यातच सदरचे संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती मिळताच कुटगीरी सजाचे तलाठी कदम यांनी जागेवर जाऊन पहाणी करुन पंचनामा केला होता.
या कामाची दखल घेऊन ग्रुप ग्रामपंचायत राजीवली चे त्या काळातील सरपंच श्री प्रशांत शिर्के यांनी मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती देवरुख व मा.उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग देवरुख यांजकडे लेखी तक्रार करून संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी किवा संरक्षण भिंतीचे नवीन बांधकाम करून देण्याची मागणी केली होती . परंतु आज रोजी प्रशासनाला लेखी कळविले असताना देखील सहा महिने कोणतीच कारवाई झाली नाही.
संबंधित ठेकेदाराची पाठराखण करत एका सामाजिक कार्यकर्त्याने संबंधित विषयाची बातमी करणार्या महालक्ष्मी टाईम्स च्या पत्रकाराला संगमेश्वर पोलिस स्टेशन मध्येच पोलिसांसमोर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला होता .
सहा महिने होऊन देखील कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमधे चर्चा होत संबंधित प्रशासन देखील येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावात काम करत आहे कि काय अशी चर्चा रंग धरू लागली आहे .त्यामुळे आता तरी देवरुख बांधकाम प्रशासन जागे होणार का ? असा खोचक प्रश्न ग्रामस्थातून उपस्थित होत आहे .