रजनीश सेठ यांनी स्वीकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार

ठाणे:प्रतिनिधी 

 दि.१ :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवननवी मुंबई येथे आज स्वीकारला. यावेळी त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. पांढरपट्टे यांनी श्री.सेठ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

            यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. पांढरपट्टेडॉ.अभय वाघडॉ.सतीश देशपांडेआयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरातसहसचिव सुभाष उमराणीकरसहसचिव सुनील अवताडेउपसचिव मारुती जाधवदेवेंद्र तावडेचंद्रशेखर पवारसंजय देशमुखविपुल पवारसंशोधन अधिकारी राजश्री भिसे आदी उपस्थित होते.

            आयोगाच्या सचिव डॉ. खरात यांनी श्री.सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रचना व कार्यपद्धती विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ही माहिती समजून घेतल्यानंतर श्री.सेठ यांनी आयोगाचा कारभार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अतिशय शिस्तबध्दतेनेपारदर्शकपणे करुअसे आवाहन आयोगाच्या सदस्यांना व अन्य अधिकाऱ्यांना केले.