कडवई :-मुजीब खान
नावडी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या. यात महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गावातील ज्येष्ठ, प्रतिष्ठीत, पदवीधर नागरीक प्रमोद भार्गवराम तथा दादा शेट्ये यांची फेरनिवड करण्यात आली आहे.यापूर्वी प्रमोद शेट्ये यांनी गावाच्या विकासासाठी अनमोल योगदान दिले आहे. आता त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.