अतिग्रे:सलीम मुल्ला
दि.१६ संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी चितवन, नेपाळ येथे इंडो-नेपाळ कल्चरल एक्सचेंज प्रोग्राममध्ये सहभागी सहभागी झाले होते. नेपाळमधील चितवन येथील प्रख्यात आंतरराष्ट्रीय शाळा अंकुराम अकादमीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमामध्ये 3 शिक्षकांसह 15 विद्यार्थी सहभागी झाले.
5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान हा सांस्कृतिक देवाणघेवाण करणारा कार्यक्रम पार पडला. संजय घोडावत स्कूल मधील विद्यार्थ्यांनी गाणी आणि नृत्याद्वारे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे सादरीकरण केले, त्याची नेपाळमधील लोकांनी प्रशंसा केली. तसेच एस जी आय मधील विद्यार्थ्यांनी अंकुराम अकादमीच्या विद्यार्थ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. कला, संगीत, नृत्य आणि वादविवाद यासारख्या सहयोगी उपक्रमांमध्ये भाग घेतला. घोडावत स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी नेपाळच्या चितवन आणि आसपास आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यांद्वारे नेपाळमधील समृद्ध इतिहास, संस्कृती, भूगोल, भाषा, पाककृती, नैसर्गिक संसाधने समजून घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी चितवन राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास केला. ॲलिगेटर प्रजनन केंद्राला दिलेली भेट ही निसर्ग संवर्धनाचे महत्त्व जाणून घेणारी होती. काठमांडूमधील मौलाकालिका मंदिर, देवघाट, स्वयंभू मठ आणि पशुपतीनाथ मंदिराला भेट देऊन नेपाळची प्रभावी वास्तुकला आणि आध्यात्मिक समृद्धी समजली. या कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थिनी ऋषिता शिंदे हीला वाटले की एक्सचेंज कार्यक्रमामुळे त्यांना सांस्कृतिक संवर्धनाची संधी मिळाली. अर्णव कुलकर्णी म्हणाला, नवीन मित्र बनवण्याचा आणि नेपाळी भाषेतील नवीन शब्द शिकण्याचा अनुभव अप्रतिम होता. या कार्यक्रमात डॉ. नवीन एच एम, श्री. महादेव पिराजी आणि श्रीमती गुल ई राणा हे शिक्षक सहभागी झाले होते. अंकुराम अकादमी व्यवस्थापन, अध्यक्ष श्री. आनंदा बहादूर चंद, संचालक श्री. नईम चौधरी, कार्यकारी संचालक, कु. सरला पौडेल, श्री. नवराज पौडेल, प्राचार्य श्री. सुमन पौडेल, सर्व शिक्षकवृंद यांनी घोडावत स्कुलच्या विद्यार्थ्यांचा नेपाळमध्ये सहा दिवस उत्कृष्ठ पाहुणचार केला. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षणात नवीन संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विश्वस्त श्री विनायकजी भोसले, संचालिका श्रीमती सस्मिता मोहंती यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.