कसबा हायस्कूलमध्ये (केंद्र क्रमांक 0652) एच.एस.सी परीक्षेचे आयोजन
संगमेश्वर:
कोंकण बोर्ड एच एस सी परीक्षा फेब्रू./मार्च २०२४, केंद्र क्रमांक 0652 बैठक व्यवस्था खालीलप्रमाणे असेल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ व कोंकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांच्यामार्फत इ.१२ वी ची परीक्षा २१/०२/२०२४ रोजी सुरु होत आहे. या परीक्षेसाठी *न्यू इंग्लिश हायस्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेज, कसबा संगमेश्वर (केंद्र क्र.०६५२ ) हे केंद्र असून संगमेश्वर, कसबा, कोळंबे, कडवई, तुरळ, बुरंबी, लोवले व आयटीआय संगमेश्वर या कॉलेज मधील जवळ जवळ ६८८ विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. केंद्र संचालिका म्हणून कोंकण बोर्डाकडून सौ.एल.एन.मणेर मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यू इंग्लिश हायस्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेज, कसबा संगमेश्वर (केंद्र क्र.०६५२ ) या केंद्रावरील बैठक व्यवस्था खालीलप्रमाणे.
*विज्ञान शाखा*
बैठक क्रमांक – W004378 ते W004542 एकूण – 164
*कला शाखा*
बैठक क्रमांक – W012364 ते W012563 एकूण – 200
*वाणिज्य शाखा*
बैठक क्रमांक – W019687 ते W019984 एकूण – 298
*आयटीआय*
बैठक क्रमांक – W026686 ते W026711 एकूण – 26
कसबा केंद्रावर परीक्षेस प्रविष्ठ होणारे एकूण विद्यार्थी *६८८*
▪️वरीलप्रमाणे बैठक क्रमांक असणाऱ्या परीक्षार्थींनी बोर्डाच्या वेळापत्रकानुसार वरील केंद्रावर परीक्षेसाठी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन केंद्र संचालिका सौ.एल एन मणेर यांनी केले आहे.