रत्नागिरी:- सिद्धेश मराठे
रत्नागिरीतील मजगाव चे बरकत मुकादम यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नऊ वेळा त्यांची तंटा मुक्ती अध्यक्ष पदी निवड झाली. ते अत्यंत कार्यशील व्यक्ति म्हणून ओळखले जातात. त्यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत.
त्यांचे विशेष म्हणजे प्रत्येक गरजवंता साठी अडीअडचणीत मदतीला धावून जाणारी व्यक्ति म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.सरपंच, उप सरपंच, गांवातील आदरणीय आणि लोकप्रिय तसेच धडाकेबाज व्यक्ति म्हणून ते परिचित आहेत. भ्रष्टाचारा पासून दूर असलेली, गांवाला तंटामुक्त ठेऊन शासनास सहकार्य करणारी व्यक्ति म्हणजेच बरकत मुकादम म्हणून ओळखली जाते.या सर्व बाबींमुळे बरकत मुकादम यांना ग्रामस्थांनी नवव्या वेळी त्यांची निवड करून यथोचित सन्मान केला असून पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.