इचलकरंजी –हबीब शेख दर्जी
दि .९:कोल्हापूर येथे पोलीस बॉईज असोसिएशनची दुसरी राज्यस्तरीय बैठक इचलकरंजी येथे मोठ्या थाटात संपन्न झाली, सदर बैठक पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी आयोजित केली होती कार्यक्रमाचे स्वागत सागर पाटील यांनी केले व प्रास्ताविक निशांत कुंभार यांनी केले.या बैठकीला पोलीस बॉईज असोसिएशनचे अकोला ,यवतमाळ ,चंद्रपूर , नागपूर , गडचिरोली ,बीड ,धाराशिव , सांगली ,कोल्हापूर ,रायगड , पुणे ,ठाणे ,अहमदनगर , जळगांव ,सोलापूर , बुलढाणा ,अमरावती ,मुंबई , इत्यादी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते
या बैठकीमध्ये महाराष्ट्र पोलीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या विविध प्रकारच्या समस्या कशा प्रकारे सोडविता येतील या संधर्भात कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी महत्वाचे मार्गदर्शन करून , पोलीसांचे सतत खाच्चीकरण करून त्यांचा अपमान करणाऱ्या राजकीय नेत्यांना मतदानातून दणका देऊन , आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण कोणाच्या पाठीशी उभे राहायचे या विषयी सुद्धा एकमताने ठराव संमत करण्यात आला
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री भास्कर शेटे दादा यांनी पोलीस बॉईज असोसिएशन कार्याची कौतुक व मार्गदर्शन केले सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी , जिल्हाध्यक्ष , व प्रदेश पातळीवरील पदाधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यामध्यले, तालुका, शहरी, ग्रामीण यांच्या नव्याने नियुक्त्या करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले
यावेळी या राज्यस्तरीय बैठकीला महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा मुंबई अध्यक्ष सय्यदराजा मुजावर , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा सांगली जिल्हाध्यक्ष विशाल सागरे , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण , विदर्भ अध्यक्ष विजय नावकार , महाराष्ट्र प्रदेश संघटक शाहेद सय्यद , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे , महाराष्ट्र प्रदेश सचिव नौशाद शेख , पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल पवार , पुणे शहर अध्यक्ष राहुल जाधव , रायगड जिल्हाध्यक्ष समीर धुपकर , धरशिव जिल्हाध्यक्ष शुभम कदम , मराठवाडा अध्यक्ष इम्तियाज शेख , बीड जिल्हाध्यक्ष मकसुद पठाण , गडचिरोली जिल्हाध्यक्ष गिरीश कोरामी , आकाश ढाली , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नदीम शेख , खान्देश अध्यक्ष मंगलसिंग राऊळ { राजपूत } ,जळगाव जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील ,अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रशांत उजागरे , अमरावती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.नंदाताई राऊत ,अकोला जिल्हाध्यक्ष नरेश राऊत , संदिप नाईक,परशराम करजगावकर तसेच कोल्हापूर जिल्हा पोलीस बॉईज असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इचलकंरजी शहर उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी केले आभार पोलीस बॉईज असोसिएशन जिल्हा सचिव रमाकांत साळी यांनी मानले