संगमेश्वर :नियाझ खान
दि.१५ : श्री स्वामी समर्थ फाउंडेशन शिरगाव ता.चिपळूण च्या वतीने चिपळूण तालुक्यातील विविध स्तरातील ६० बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्ती,संस्था यांना पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये २०२४ चा आदर्श खाजगी क्लासेस शिक्षकरत्न पुरस्कार अमेय क्लासेस सावर्डेच्या संचालिका सौ.वृषाली रामचंद्र नांदिवडेकर यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला
.विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन विद्यार्थी प्रगतीसाठी आदर्श अभ्यासिका केंद्र निर्माण केले असून,यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात,विविध स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थी राष्ट्रीय, राज्यस्तर,जिल्हा पातळीवर चमकले आहेत.स्वतंत्र वर्गखोली,अनुभवी मार्गदर्शक, शैक्षणिक साहित्याचा वापर,तंत्रज्ञानाचा वापर ,भरपूर सराव यामुळे विद्यार्थ्याबरोबर सावर्ड्यातील पालकांना अमेय क्लासेस हवाहवासा वाटतो.सूक्ष्म नियोजन,उत्तम व्यवस्थापन यामुळे अमेय क्लासेस निश्चितच प्रगतीपथावर असून याची दखल घेऊन हा पुरस्कार अमेय क्लासेसला प्रदान करण्यात आल्याने सावर्ड्यातील सर्व पालक वर्गातून व सर्व स्तरातून सौ.वृषाली नांदिवडेकर व सर्व शिक्षकवृंद यांचे अभिनंदन होत आहे.
या सत्कारप्रसंगी अमेय क्लासेसचे मार्गदर्शक श्री.रामचंद्र नांदिवडेकर,नातेवाईक कुंभार व साळवी परिवार उपस्थित होते.व्यासपीठावर अध्यक्ष M.E.S.आयुर्वेद महाविद्यालय लोटेचे प्राचार्य प्रा.डॉ.श्यामसुंदर भाकरे, व विधी प्रशाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डायरेक्टर प्रा. डॉ. ज्योती भाकरे,कोल्हापूर चे उद्योजक मा.डॉ.श्री. अभिजित घाटगे, लोटे MIDC चे उद्योजक मा. श्री. कुंदन मोरे व निपाणीचे नामांकित वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अमर वंजोळे,श्री स्वामी समर्थ फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. श्री. विशाल पेटकर व उपाध्यक्ष डॉ. सौ. स्वाती पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.