लांजा :नसिर मुजावर
जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अजित यशवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के यांच्या आदेशाने लांजातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे ज्येष्ठ नागरीक दिन साजरा करण्यात आला.
युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे शहरातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देत जेष्ठ नागरिकांचे आशिर्वाद घेऊन जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, अभिजित राजेशिर्के, सामाजिक न्याय सेलचे माजी तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे व आमदार रोहीत पवार फॅन्स क्लबचे उपजिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.