कोल्हापुरात गांधीजीच्या वेशभूषात साहेबराव काशीद

कोल्हापूर महानगर पालिकेच्या वतीने महात्मा गांधी यांना अभिवादन

कोल्हापूर:  सौ रेणूताई पोवार

     2 आँक्टोबर  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती कोल्हापुरात साजरी करण्यात आली. दर वर्षी प्रमाने गांधी मैदान, कोल्हापूर येथे कोल्हापूर महानगर पालिका याच्या वत्तीने महात्मा गांधी यांच्या मुर्तीचे पुजन पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली . यावेळी साहेबराव काशीद हे गांधीजींच्या वेशभूषात  हजर होते. त्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती
पालक मंत्री श्री मा सतेज उर्फ बंटी पाटील,  महानगरपालिका चे आयुक्त सौ कांदबरी बलकवडे ,महापौर सौ आजरेकर तसेच सर्व  महानगर पालिकेचे नगरसेवक ,अधिकारी व  कर्मचारी याची  यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पालक मंत्री  श्री सतेज पाटील म्हणाले स्वच्छ निर्मल भारत हे अभियान जागृत ठेवत , प्लास्टिक मुक्त कोल्हापूर करुया .कोल्हापूरातील सर्व कचरा कोडाळे नष्ट व्हावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे. घरोघरी घंटागाडी पोहचते  याचा उपयोग करुन ओला कचरा, वाळला कचरा घंटा गाडीत टाकावा  . प्रशासनाला नागरीकांनी सहकार्य करावे. गांधीजीच्या वेशभुषातील श्री साहेबराव काशिद यांचा सत्कार पालकमंत्री श्री सतेज पाटील यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या

I