पालिकेच्या शाळांची दुर्देशे बाबत चौकशी व समिती गठण व्हावी

मराठी एकीकरण समिती..

इचलकरंजी :विजय मकोटे

दि .१ जून श्रीमंत महापालिकेच्या शाळेत मूलभूत पाणी व स्वच्छतागृह नसल्याने शाळेत घेतलेला प्रवेश पालक रद्द करत असतील तर आपणासाठी ही लज्जास्पद बाब आहे यासाठी पूर्णपणे पालिकेचा भोंगळ कारभार जबाबदार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे व तो मिळालाच पाहिजे अशी मागणी निवेनाद्वारे पालिकेचे उप आयुक्त श्री आढाव साहेब यांना देण्यात आले..

इचलकरंजी ही जनसामन्य कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात असलेली वस्त्रनगरी आहे..चांगले व उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार प्रत्येक विद्यार्थ्यांचां आहे परंतु पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे व नियोजन शून्य कृतीमुळे पालिकेच्या शाळांच्या दुरावस्था झाल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत आहे व पालिका शाळा बंद पडून विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहत असून सोबतच इतर खाजगी शाळेत नाईलजाने प्रवेश घ्यावा लागत असल्याने पालकांना आर्थिक दंड सोसावा लागत आहे..शाळांच्या विविध सुविधांसाठी निधी उपलब्ध होतो परंतु त्याचा वापर कुठे केला जातो निधी कुठे गायब होतो हे गोडबंगाल सामान्य जनतेला कळत नाही आहे..नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी अद्याप पालिका शाळा ह्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.. पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून पालिकेने कोणते उपक्रम राबवले याबाबत प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय ठरलेले आहे..

मध्यंतरी सामान्य लोकांच्यातून आवाज उठवल्यानंतर शासनाने पालिकेला शाळांचे आधुनिकरणासाठी मॉडेल सादर करण्यास सांगितले होते त्याचे काय झाले..!? त्याचा पाठपुरावा कुठपर्यंत करण्यात आला..!? वेळोवेळी निधी उपलब्ध असूनही सुविधा शाळेत का उपलब्ध झाल्या नाहीत यामध्ये कोणता भ्रष्टाचार झाला का..!? विद्यार्थ्यांची संख्या पालिकेच्या शाळेमध्ये वाढावेत म्हणून आपण काय उपक्रम घेतला या सर्वांची चौकशी व्हावी यासाठी निपक्ष पणे पणे कार्य करणाऱ्या शिक्षकांची व सोबत आमच्यासारख्या सामाजिक संस्था यांची ५ जणांची समिती नेमून यावर विचार व्हावा व पालिकेचे शाळेची दुरुस्ती होऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळावा तेही दर्जेदार व पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल यावर भर द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..पुढील पंधरा दिवसात यावर कोणतीही कारवाई किंवा अहवाल उपलब्ध झाले नसल्यास पालिकेतील शाळेंच्या विद्यार्थ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यास पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार राहील असे ही सांगण्यात आले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×