महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवईत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

 

कडवई:(नियाझ खान)

महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात कुरान पारायणाने झाली, ज्याचे पठण शाळेतील विद्यार्थी अतिफ दसुरकर यांनी केले.

[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..

नियाझ खान —9921435330..

दिपक तुळसणकर —9730389876)..

नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक इमरान कापडी सर यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन फाईक मोडक, कॅप्टन रफिक मोडक, जफर चरफरे, सम्रान हफ्सानी, रोझीना खलफे, राहील कडवईकर, सना कडवईकर, नजीफा मिस, सिमीन मिस, फरीन शेख, बासीद , आबीद जांभारकर, नियाज डोंगरे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि पीटीए सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.आलेल्या पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक कारीगर सर आणि क्रीडा शिक्षक जावेद देखनी सर यांनी गुलाबपुष्प देऊन केले. विद्यार्थ्यांसाठी क्रीडा शपथविधीचा कार्यक्रमही पार पडला, ज्यामध्ये शाळेचा उत्कृष्ट खेळाडू अदनान शहा याने शपथ घेतली आणि ती सर्व विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या क्रीडा महोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना व संघभावनेचा संदेश पोहोचवला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
00:02