बालकांसंदर्भात कार्य करणाऱ्या यंत्रणांना बालकांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आवाहन
सांगली : प्रतिनिधी
दि. 23, : राज्य बाल हक्क आयोगाची बैठक महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यात बालकांसंदर्भात कार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा, बाल कल्याण समिती, विशेष बाल पोलिस पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, रेल्वे चाईल्ड यांच्या कामकाजाचा आढावा घेवून सर्व यंत्रणांनी बालकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे, ॲड. जयश्री पालवे, जिल्हा परिविक्षा अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगुले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे, बाल कल्याण समिती अध्यक्ष निवेदीता ढाकणे, सदस्य कालीदास पाटील, शिवकुमारी ढवळे, आयेशा दानवाडे, दिपाली खैरमोडे व चाईल्ड लाईन सांगली व रेल्वे चाईल्ड मिरज सदस्य बैठकीस उपस्थित होते.
बैठकीमध्ये बालसंगोपन योजना, दत्तक प्रक्रिया, बाल विवाह, बालकांचे पुनर्वसन, बाल भिक्षेकरी, कोविड-19 मधील अनाथ बालकांच्या बाबत चर्चा करण्यात आली. तसेच दादुकाका भिडे मुलांचे बालगृह/निरीक्षणगृह व सौ. सुंदराबाई मालू मुलींचे बालगृह/निरीक्षणगृहांना भेट दिली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.