डीकेटीईतील टेक्स्टाईलच्या तब्बल १९ विद्यार्थ्यांची जगप्रसिध्द वेलस्पन कंपनीत निवड

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि १८ जूनः डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील १९ विद्यार्थ्यांची जगप्रसिध्द वेलस्पन या इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंट झाली आहे.  वेलस्पनच्या वापी, अंजार, हैद्राबाद येथील युनिटसाठी कंपनीने डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची निवड केली. वेलस्पन ही कंपनी टेरी टॉवेल, शीटींग फॅब्रिक्स, नॉनवोव्हन फॅब्रिक्स, इत्यादी विविध विभागानी युक्त आहे. वेलस्पन ही वस्त्रोद्योगातील विख्यात अशी कंपनी दरवर्षी डीकेटीईस भेट देते व विद्यार्थ्यांची निवड करते.  याही वर्षी वेलस्पन कंपनीने रिटन टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्हयू अशा विविध चार फे-यांमधून विद्यार्थ्यांची बौध्दिक गुणवत्ता तपासली व एकूण १९ विद्यार्थ्यांचे कंपनीच्या विविध विभागामध्ये प्लेसमेंट केले.  
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविणारी व उत्तमोत्तम प्लेसमेंट करणारी डीकेटीई ही संस्था देशात आघाडीवर आहे.शिक्षणाबरोबरच प्लेसमेंट बाबतही आज पालक आणि विद्यार्थी विचार करत असतात.  या दोन्ही क्षेत्रात डीकेटीई सर्वोत्तम कामगिरी करत आहे.
निवड झालेले विद्यार्थी श्रेया माळी, नैना प्रजापती, शुभम यडकुने, प्रतिक्षा पाटने, रोहन पाटील, अभिजीत कुंभार, प्रतिक खतकर, साक्षी पाटील, यश चव्हाण, प्रियंका बरी, अथर्व हिरेमठ, श्रेयश बाबर, मंदार साळी, श्री टकले, श्रुती सिंग, प्रांजल शेटे, नम्रता जामदार, वैष्णवी बडे व प्रशांती भागवत.
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे , उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटचे प्र. संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. एस.बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×