आमदार संजय गायकवाड यांच्या हिंसात्मक विधानावर अशोक जाधव यांच्याकडून देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल – आमदारकी रद्द करून कठोर कारवाईची मागणी

 

*कडवई:१७/०९/२०२४*

 

महाराष्ट्र विधानसभा सदस्य संजय गायकवाड यांनी दिनांक 16/09/2024 रोजी दूरचित्रवाणीवरील एका मुलाखतीत मा. राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीस रोख बक्षीस देण्याचे विधान केले. या धक्कादायक विधानानंतर, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अशोक जाधव यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिनांक 17/09/2024 रोजी संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी संजय गायकवाड यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

संजय गायकवाड हे एक लोकप्रतिनिधी असून, त्यांनी आमदारकीच्या शपथेचे उल्लंघन केल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. भारत आणि महाराष्ट्र संविधानावर आधारित लोकशाही व्यवस्थेत चालवले जात असताना, संजय गायकवाड यांचे विधान संविधानाचा अपमान करणारे आणि हिंसात्मक आहे. त्यामुळे त्यांनी लोकशाही मूल्यांचे पालन केलेले नाही.

 

अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेसने संजय गायकवाड यांची आमदारकी तातडीने रद्द करून, त्यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×