किरण (भैय्या) सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हातदे गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश
रत्नागिरी:
राजापूर तालुक्यातील हातदे गावातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, आणि अनेक ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. सिंधूरत्न समृद्ध योजनेचे कार्यकारी समिती सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, आणि शिवसेना नेते किरण (भैय्या) सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश करण्यात आला. शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा साळवी, तालुका संघटक भरत लाड, विभाग प्रमुख शैलेश साळवी, पाचल सरपंच बाबालाल फरास, युवा सेना तालुका प्रमुख सुनील गुरव, उप विभाग प्रमुख उदय राणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सरपंच विश्वनाथ पाटकर, उपसरपंच जयप्रकाश चव्हाण, माजी सरपंच सुनील चव्हाण, दत्ताराम धामापुरकर आदींसह गावातील अनेक प्रमुख व्यक्तींनी पक्षात प्रवेश केला. गावातील विकासाची दिशा बदलण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत किरण (भैय्या) सामंत यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या पक्ष प्रवेशाने गावात आनंदाचे वातावरण असून, प्रवेश करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.