भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बैठक संपन्न

इचलकरंजी :प्रातिनिधी

दि .१४: भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे प्रदेश कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर  कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीमध्ये बूथ रचनात्मक काम, पक्षीय संघटनात्मक कामकाज, नव मतदार नोंदणी अभियान, नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातील विविध योजना, शासनाने घेतलेले निर्णय बाबात अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा प्रदेश उपाध्याक्ष सुरेश हाळवणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पश्चिम राहुल देसाई, मा.जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, भाजपा इचलकरंजी शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले, ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजू आदी उपस्थतीत होते.

या वेळी बोलताना सुरेश हाळवणकर म्हणाले की, येणारी विधानसभा निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आत्तापासूनच कामाला लागावे. तसेच राज्य शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांची माहिती आपल्या बुधमधील नागरिकांपर्यंत पोहोचण्याची काम करावे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवून आपल्या बूथ मधील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून द्यावा. १२ वी नंतर मुलींचं शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे असे सांगितले. तसेच निवडणुकी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली जाणार असून त्यादृष्टीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी तळागाळातील लोकांच्यापर्यंत शासनाच्या विविध योजना घेऊन पोहोचाव्यात. इचलकरंजीमध्ये आमदार व  महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पक्षाने दिलेली काम लोकांपर्यंत पोहोचवावे असे सांगितले. या निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल असेही सांगितले. यावेळी विजय भोजे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, धोंडीराम जावळे आदींनी शासनाने दिलेल्या योजनांची माहिती शासनाने जाहीर केलेला अर्थसंकल्प याबाबत माहिती दिली. तसेच कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे असे सूचित करून मार्गदर्शन केले.

यावेळी सरचिटणीस राजेश रजपुते, महिला अध्यक्ष सौ.अश्विनी कुबडगे, विनोद कांकाणी, धोंडीराम जावळे तसेच सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख शहर कार्यकारिणी पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला मोर्चा, युवा मोर्चा, विविध आघाडीचे प्रमुख, तसेच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×