भाजपा सक्रिय सदस्यता अभियान प्रभावीपणे राबवावे – सुरेश हाळवणकर
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .१३ : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत होत आहे. डबल इंजिन सरकारमुळे देश आणि महाराष्ट्र प्रगतिशील होत असून, मोठ्या प्रमाणात नागरिक भाजपा सदस्यत्व घेण्यासाठी उत्सुक आहेत, असे प्रतिपादन प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाने सदस्य नोंदणी अभियानात प्रथम क्रमांक पटकावला असून, संपूर्ण महाराष्ट्रात हा मतदारसंघ पाचव्या स्थानावर आहे. या यशाबद्दल शहराध्यक्ष अमृतमामा भोसले यांचे अभिनंदन करण्यात आले.
संपूर्ण ताकदीने सदस्यता अभियान राबविण्याचे आवाहन
येत्या काळात सक्रिय सदस्यता अभियान अधिक जोमाने राबवावे व संघटन बळकट करावे, असे आवाहन हाळवणकर यांनी केले. तसेच सरकारच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून करावा, असेही त्यांनी सांगितले.यावेळी शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले व अभियान संयोजक शशिकांत मोहिते यांनी कार्यकर्त्यांना भागानुसार जाऊन नागरिकांना सक्रिय सदस्यत्व नोंदणी करण्याचे आवाहन केले.
बैठकीत मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस अभियान प्रमुख विजय भोजे, अशोक स्वामी, राजेश राजपुते, महिला अध्यक्षा सौ. अश्विनी कुबडगे, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अनिल डाळ्या, सौ. विजया पाटील, सौ. उर्मिला गायकवाड, अहमद मुजावर, विनोद कांकानी, सौ. नीता भोसले तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदस्यता अभियान यशस्वी करण्यासाठी संपूर्ण भाजपा संघटना उत्साहाने काम करत असून, आगामी काळात हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवले जाणार आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.