भाजप कडुन पंडित दीनदयाल उपाध्याय यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली

अंत्योदय’ संकल्प साकारण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय याचे कार्य आदर्शवत शहराध्यक्ष पै अमृत भोसले

इचलकरंजी :विजय मकोटे
दि १२ : सेवा, सुशासन आणि विकास यातून ‘अंत्योदय’ संकल्प साकारण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेली मूल्ये आपल्या कर्तव्याचा मार्ग बनून मार्गदर्शन करतात. त्यांचे कार्य नेहमीच आदर्शवत ठरणारे आहे, असे प्रतिपादन जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग म्हातुंगडे यांनी केले. अखंड मानवतावादाचे प्रणेते आणि कुशल संघटक आदरणीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त इचलकरंजी भाजप पार्टी शहर कार्यालयात रविवारी आदरांजली अर्पण करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रखर राष्ट्रवादी आणि वंचितांच्या हक्काचे निर्माते, अत्यंत साधी जीवनशैली जगणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीचा प्रवाह एकत्र आणणाऱ्या दीनदयाळजींचे जीवन हजारो भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतीय संस्कृती आणि वारसा केंद्रस्थानी ठेवून देशाला पुढे नेण्याचा मार्ग दाखवला. पंडित दीनदयालजी यांचे जीवन हे राष्ट्रसेवेचे आणि समर्पणाचे महान प्रतीक आहे. कोणताही देश आपल्या संस्कृतीच्या मूलभूत कल्पना विसरून प्रगती करू शकत नाही, असा त्यांचा विश्वास होता. जेव्हा जेव्हा मानवतेच्या कल्याणाचा प्रश्न येतो तेव्हा पंडितजींची अखंड मानवतावाद आणि अंत्योदयाची तत्त्वे ध्रुव तारेप्रमाणे संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करतील. त्यांची मूल्ये पक्षासाठी नेहमीच मार्गदर्शक राहतील, असे मत व्यक्त करीत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती “घर चलो अभियाना”च्या माध्यमातून नागरिकापर्यंत पोहोचवून खर्या अर्थाने त्यांचा आदरांजली ठरणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रसंगी ज्येष्ठ नागरिक यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस बालकृष्ण तोतला यांनी केले.यावेळी, वरिष्ठ नेते मिश्रीलाल जाजू, शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले,सं गां.नि.यो.अध्यक्ष अनिल डाळ्या, राजेश रजपुते,उत्तम चव्हाण, उमाकांत दाभोळे,दिपक पाटील
सचिन माळी,ॲड. भरत जोशी, महेश पाटील,प्रदीप मळगे, ,सलिम शिकलगार, जयदीप पाटील, मनोज जाधव, चंद्रकांत चौगुले, सचिन पवळे, हेमंत वरुटे ,फारुक बागेवाटी, प्रदीप कांबळे, लालचंद पारिख, भानुदास तासगावे व इतर पदाधिकारी यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, सर्व मोर्चा / आघाडी / प्रकोष्ठ प्रमुख, मंडल पदाधिकारी,विधानसभा वॉरियर्स, शक्ति केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×