भाजप महिला मोर्चा रत्नागिरी आणि यश फाउंडेशन संस्था रत्नागिरी पुरस्कृत मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न
रत्नागिरी: मुजीब खान
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी व दि यश फाउंडेशन संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळागौर स्पर्धा मुंबई गोवा हायवे मार्गालगत असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाल्या.
यामध्ये संगमेश्वर विभागातून महिलांचे एकूण 14 गट सामील झाले होते. मंगळागौर स्पर्धेमध्ये मंगळागौरीचे विविध प्रकार तसेच फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार सादर केले गेले.
या मंगळागौर स्पर्धेमध्ये संगमेश्वर नावडी मधील अमृता ग्रुप ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या प्रथम क्रमांकाच्या महिलांना माननीय बाळासाहेब माने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम दहा हजार देऊन सन्मानित करण्यात आले.
या महिलांनी सादरीकरणामध्ये मंगळागौरीचे एकूण 45 प्रकार बारा मिनिटात सादर केले. अमृता ग्रुप मधील सौ.अमृता कोकाटे सौ.जानवी चिंचकर सौ.सविता हळदकर सौ.आर्या मयेकर, सौ.सानिका कदम सौ. नयना शेट्ये, सौ.अर्पिता शेरे, सौ.सुप्रिया कदम, सौ. सुविधा शेट्ये,सौ. संगीता जंगम यांनी मिळून नाविन्यपूर्ण मंगळागौरीचे प्रकार सादर केले. विशेष कौतुक म्हणजे कु.जुई सुतार आणि कु.आर्या कोकाटे या दोघींनी मिळून स्वतःच्या सुमधुर स्वरांनी मंगळागौरीतील सर्व गाणी गायली. यांच्या गाण्याला कु.गिरीराज लिंगायत यांनी तबल्याची सुंदर साथ दिली . कु.गायत्री मयेकर हिने सुंदर घुंगुर वादन करून साथ दिली.
पारंपारिक खेळांच्या स्पर्धांमुळे तरुण पिढीला सुद्धा पारंपारिक गोष्टींचे ज्ञान अवगत होत आहे.
16 ऑगस्ट रोजी संगमेश्वर विभागातून राधा गोविंद फाउंडेशन सावर्डे पुरस्कृत मुक्तांगण आयोजित पारंपारिक नृत्य कला स्पर्धा झाली त्यामध्ये प्रथम क्रमांक तसेच 25 ऑगस्ट रोजी माननीय आमदार उदयजी सामंत प्रतिष्ठान श्रावण उत्सव मंगळागौर स्पर्धा शुभगंधा हॉल लोवले येथे पार पडली त्यामध्येही त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
महिलांच्या मंगळागौर स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाच्या हॅट -ट्रिक साठी संगमेश्वर ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले. संपूर्ण संगमेश्वर विभागातून या महिलांचे कौतुक होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.